Gujar community ban on pre-wedding photo shoot प्री वेडींगसह फोटो शुटवर गुजर समाजाची बंदी
समाजातील अनिष्ट चालीरीती बंद करण्यासाठी गुजर समाजाचा पुढाकार
Gujar community ban on pre-wedding photo shoot रावेर : समाजातील अनिष्ट चालीरीती बंद करण्यासाठी गुजर समाजाने पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील मोठे वाघोदे श्रीकृष्ण मंदिर आश्रमात गावातील गुजर समाज बांधवांची सभा नुकतीच झाली. या सभेत समाजातील लग्न कार्यामध्ये असलेल्या अनिष्ट चालीरीतींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने प्री वेडिंगसह फोटो शुटवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचेही ठरले. आगामी मे महिन्यात असलेल्या लग्नांसाठी हे नियम लागू असतील, असेही सभेत ठरले.
ठराव न पाळल्यास लग्न कार्यात सहकार्य न करण्याची भूमिका
गाव पातळीवर सर्व संमतीने पारीत झालेल्या ठरावांचे पालन न करणार्या परीवाराला त्यांच्या घरी आयोजित लग्नकार्यास गावातील समाज बांधवांचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला. गुजर स्नेहवर्धक मंडळातर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन योगेश सुरेश पाटील यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक राजाराम पाटील होते. सभेला गावातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- गुजर समाजाने पारीत केले हे ठराव
प्री-वेडिंग व फोटोशूट बंद
वाजंत्री (बॅण्डमध्ये) मध्ये तृतीयपंथी नाचवण्यास बंदी
लग्नातील जानोसा पद्धतीत नाश्ता बंद
मेहंदी कार्यक्रमावर पूर्णपणे बंदी
हळद असलेल्या दिवशी जेवणाच्या कार्यक्रमावर बंधने
गावात लग्न लागून आल्यावर वधू-वराच्या स्वागत मिरवणुकीवर बंदी
