यावल पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारीपदी एल.आय.तडवी


यावल : येथील पंचायत समितीच्या नियमित सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणुन शुक्रवारी एल.आय. तडवी यांनी आपला पदभार स्विकारला. यावल पंचायत समितीत गत एक वर्षांपासून रीक्त असलेल्या या पदावर अखेर जळगाव येथे पशुधन पर्यवेक्षक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले लुकमान आय.तडवी यांची सहाय्यक गटविकास अधिकारीपदी नेमणूक झाली. यापूर्वीच नियमित गटविकास अधिकारी म्हणून एन.एस.पाटील यांनी यावल पंचायत समितीची सुत्रे सांभाळली आहेत. अधिकार्‍यांमुळे ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !