भुसावळात 22 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा


महाजनादेश यात्रेचा सुधारीत दौरा ; 23 ला महाजनादेश यात्रा विदर्भात

भुसावळ : राज्यातील पूरस्थिती, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन व राज्यातील अतिवृष्टीचा तडाखा आदी कारणांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती मात्र स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांना महाजनादेश यात्रेचा दौरा प्राप्त झाला असून 22 ऑगस्ट रोजी धुळे येथून सकाळी महाजनादेश यात्रेला प्रारंभ होत असून अमळनेर येथे सकाळी 11.30 वाजता तर धरणगाव येथे 12.30 वाजता महाजनादेश यात्रा पोहोचणार आहे तर दुपारी 1.30 वाजता जळगाव येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता जामनेर येथे व सायंकाळी पाच वाजता भुसावळात जाहीर सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

23 रोजी महाजनादेश यात्रा विदर्भात
भाजपच्या महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 8 ऑगस्टला होणारा भुसावळातील दौरा रद्द झाला असलातरी तो आता 22 ऑगस्टला होणार आहे. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता शहरात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार असून मुख्यमंत्री मुक्कामी राहणार आहेत. दुसर्‍या दिवशी 23 ऑगस्टला बोदवडमार्गे महाजनादेश यात्रा विदर्भात जाणार आहे. शुक्रवारी सकाळी किन्हीमार्गे यात्रा बोदवडला जाणार असून नंतर विदर्भातील मलकापूर येथे जाहीर सभा होणार आहे.


कॉपी करू नका.