होय, पाणी भोवल्यानेच भाजपा उमेदवाराचा पराभव
आमदार संजय सावकारे : कामे न केल्यास लोक घरी बसवतात
भुसावळ : पालिकेच्या पोटनिवडणुकीत पाणी भोवल्यानेच भाजपा उमेदवाराचा पराभव झाल्याची प्रांजळ कबुली आमदार संजय सावकारे यांनी येथे दिली. ते म्हणाले की, जनतेला ज्या कामांसाठी लोकप्रतिनिधींना निवडून दिले आहे ती कामे न केल्यास जनता घरी बसवते, असे सूचक विधानही त्यांनी करीत पालिकेतील सत्ताधारी नगराध्यक्षांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शहरात आयोजित एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते. युतीचे सरकार आले असतेतर अधिक बरे झाले असते, असे सांगुन पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कामाला न्याय देणारे लोकप्रतिनिधी असून ते चांगल्या-चांगल्यांना पाणी पाजू शकतात, असेही ते म्हणाले.
