वढवेतील विवाहितेचा छळ : आमोद्यातील पतीसह तिघांविरोधात गुन्हा
Harassment of married woman in Vadve : Crime against three including husband in Amodia मुक्ताईनगर : चारचाकी घेण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये न आणल्याने आमोदा येथील सासर व वढवे येथील विवाहितेचा छळ करण्यात आला तसेच विवाहितेची दोन्ही मुले बळजबीरने संशयितांनी ताब्यात ठेवली. या प्रकरणी पतीसह तिघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
शैला विकास पाटील (32) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, 2011 ते 2021 दरम्यान चारचाकी घेण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये न आणल्याने पती विकास रमेश पाटील, सासरे रमेश कडू पाटील व सासू मिराबाई रमेश पाटील यांनी शारीरीक व मानसिक छळ केला तसेच गत दोन वर्षांपासून घराबाहेर काढून दिले. तपास हवालदार अशोक जाधव करीत आहेत.
