आटवाडे शिवारात शेती वाद उफाळला : आठ संशयीतांकडून तिघांना मारहाण


Agricultural dispute erupts in Atwade Shivar : Three beaten up by eight suspects रावेर : शेतीच्या वादातून आटवाडे शिवारात तिघांना मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता घडली. या प्रकरणी आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांना मारहाणीचा आरोप
भास्कर भिका पाटील (60, आठवडे बाजार, रावेर) यांच्या तक्रारीनुसार, संशयितांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवत त्यांच्यासह नरेंद्र भगवान भोई व किरण हरी पाटील यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. भूरा इब्राहीम खॉ, फैजल ईकबाल खॉ, वसंत केशव पाटील, ईकबाल ईस्माईल खॉ, याकूब ईस्माईल खॉ, शाहरूख ईस्माईल खॉ, फारूक ईस्माईल खॉ, सलमान मेहमूद खॉ (सर्व रा.आटवाडे, ता.रावेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र राठोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !