भुसावळात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार : पीडीता चार महिन्यांची गर्भवती, तरुणाविरोधात गुन्हा


Rape of 14-year-old minor girl in Bhusawal : Victim four months pregnant, crime against youth भुसावळ : घरकाम करणार्‍या 14 वर्ष 3 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर लग्न करण्याचे आमिष दाखवून सातत्याने अत्याचार करण्यात आल्याने पीडीता चार महिन्यांची गरोदर राहिल्याची धक्कादायक बाब शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित इम्रान मुक्तार सैय्यद (22, भुसावळ) याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्याचारातून पीडीता गर्भवती
जानेवारी 2023 पूर्वीच्या चार महिन्याआंधी संशयित इम्रान मुख्तार सैय्यद ( 22) याने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याच्या मामाच्या घरात पीडीतेस इशार्‍याने बोलावत लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले तसेच पीडीतेसोबत सेल्फी काढून ते इन्स्टाग्रामवर ठेवली. अत्याचार झाल्याने पीडीता त्यातून चार महिन्यांची गर्भवती राहिली व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडीतेने बुधवार भुसावळ तालुका पोलीस ठाणे गाठत कैफियत मांडल्याने पोस्कोन्वये संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !