दोन गावठी कट्टे व जिवंत काडतूसांसह भुसावळसह साकेगावातील आरोपी जाळ्यात

भुसावळ पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची कामगिरी : शस्त्र तस्करी ऐरणीवर


Accused in Sakegaon along with Bhusawal along with two village knives and live cartridges भुसावळ : भुसावळ पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस व दोन चॉपर बाळगणार्‍या व विक्री करणार्‍या साकेगावातील दोघांसह भुसावळातील एकाच्या मुसक्या बांधल्या आहेत. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा करण्यात आली. शाहरूख राजू पटेल (25, आंबेडकर नगर, साकेगाव, ता.भुसावळ) व विकास पांडुरंग लोहार (30, श्रीराम नगर, साकेगाव, ता.भुसावळ) व जयसिंग उर्फ सोनू रायसिंग पंडित (26, वाल्मीक नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील हवालदार सुरज पाटील, हवालदार रमण सुरळकर, नाईक यासीन पिंजारी आदींच्या पथकाने केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !