भुसावळातील बियाणी मिल्ट्री स्कूलमध्ये क्राँस कंट्री मॅरेथॉन


भुसावळ : शहरातील निवासी सैनिकी शाळेची क्रॉस कंट्री मैरेथान शनिवारी पहाटेच्या आल्हाददायी वातावरणात पार पडली. संस्थाध्यक्ष मनोज बियाणी व सचिव संगीता बियाणी व इतर मान्यवरांनी स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. या स्पर्धेत शाळेतील 800 विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला व तीन गटात स्पर्धा घेण्यात आली.

या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश
प्रथम गटात मुलांमधुन रसूल फिरोज तडवी तर द्वितीय प्रणव सुभाष बारेला व तृतीय अमर रमेश बारेला आला. मुलींमधून प्रथम रोशनी लक्ष्मण बारेला व द्वितीय शीतल कैलाश बारेला आली. प्रसंगी राजीव पारीख, प्रवीण भराडीया व प्राचार्य डी.एम.पाटील आदी उपस्थित होते. र्स्पेसाठी भुसावळ शहर वाहतूक शाखेचे संदीप राजपूत, भाऊसाहेब पाटील, तालुका पोलिस ठाण्याचे अजय माळी, प्रवीण पाटील यांचे सहकार्य लाभले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !