गुंतवणुकीच्या आमिषाने बंटी-बब्लीने घातला महिलेला 19.67 लाखांचा गंडा


नागपूर : नागपूरातील ‘बंटी-बबली’ने एका विवाहितेला तब्बल 19.67 लाखांचा चुना लावला असून अशाच पद्धत्तीने अनेकांना फसवल्याचा संशय आहे. रींकेश रुपचंद रामवानी (नारी रोड) व स्नेहा कटारिया-रामवानी (कमलकुंज चौक, जरीपटका) अशी आरोपींची नावे असून ते पती-पत्नी आहेत.

जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक
दुर्गा अनिल बिस्ट (27) यांची 2018 मध्ये आरोपी दांपत्याशी एका खाजगी बँकेत खाते उघडत असताना ओळख झाली होती. 2020 मध्ये बिस्ट यांना एचडीएफसी बँकेच्या घाट रोड शाखेत खाते उघडायचे होते. त्यामुळे त्यांनी रिंकेशला संपर्क केला. रिंकेशने तो एचडीएफसी बँकेत फिल्ड मॅनेजर असल्याचे सांगून त्यांना खाते उघडून दिले. त्यांच्या खात्यात जास्त रक्कम दिसल्याने रिंकेशने त्यांना बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून दाम्पत्याने ऑगस्ट 2020 ते एप्रिल 2023 या कालावधीत त्यांच्याकडून कधी रोख तर कधी ‘युपीआय’च्या माध्यमातून 19 लाख 67 हजार रुपये घेतले. मात्र त्यांनी बिस्ट यांना ना व्याजाची रक्कम दिली ना मुद्दल परत केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !