दीपनगर प्रकल्पातून 48 हजारांच्या पाईपांची चोरी
भुसावळ : दीपनगर प्रकल्पातून राख वाहून नेण्यासाठी कामात येणारे 48 हजार रुपये किंमतीचे चार लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार 29 ते 30 एप्रिलदरम्यान घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
दीपनगर प्रकल्पाचे स्टोअर इंचार्ज सुधाकरसिंग रामअवतार सिंग (42, दीपनगर, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, दीपनगर पॉवर प्लँट 660 प्रकल्पासमोरील राख वाहून नेणार्या पाईप लाईनीचे आठ इंची व 12 मीटर लांबीचे व 48 हजार रुपये किंमतीचे चार पाईप अज्ञात चोरट्यांनी 29 रोजी सायंकाळी सहा ते 30 एप्रिलच्या सकाळी 10.30 वाजेदरम्यान लांबवण्यात आले. अज्ञात चोरट्यांविरोधात या प्रकरणी सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शामकुमार मोरे करीत आहेत.
