निंभोरा गावातील अल्पवयीन तरुणीस पळवले
A minor girl from Nimbhora village was abducted रावेर : तालुक्यातील निंभोरा येथील 17 वर्ष 11 महिने वयाच्या अल्पवयीन तरुणीला पळवून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी निंभोर्यातील तरुणाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गावातील तरुणाविरोधात गुन्हा
42 वर्षीय पित्याच्या तक्रारीनुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीला गावातीलच अमोल अशोक मोरे (निंभोरा, ता.रावेर) याने काहीतरी फूस दाखवून पळवून नेले. या प्रकरणी भादंवि 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक राजेंद्र काशीनाथ पाटील करीत आहेत.
