धुळे-सुरत महामार्गावर कार अपघातात अहमदाबादची महिला ठार


Ahmedabad woman killed in car accident on Dhule-Surat highway नंदुरबार : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील बर्डीपाडा फाट्याजवळील टोलनाक्याच्या बांधकामाच्या ठिकाणी गुरुवारी पहाटे भरधाव कार कठड्याला धडकून झालेल्या अपघातात अहमदाबाद शहरातील 70 वर्षीय वृद्ध महिला ठार झाली तर कारमधील आठ जणदेखील जखमी झाले. वत्सला गोवर्धन सोनवणे (70) असे मृत महिलेचे नाव आहे.

दुभाजकावर कार आदळून अपघात
राष्ट्रीय क्रमांक सहावर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून बर्डीपाडा फाट्यानजीक टोलनाक्याचे बांधकाम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी कोणतेही सूचना व दिशादर्शक फलक नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. गुरुवारी पहाटेदेखील अपघात झाला. भरधाव कार दुभाजकाला धडकल्यानंतर ग्रामस्थांसह विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, हवालदार लिनेश पाडवी, अतुल पानपाटील व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नवापूर रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

कुटूंबातील आठ जण जखमी
जखमींमध्ये हरीश मनोहर भालेराव, राहुल यशवंत नगराळे, सावित्री राहुल नगराळे, सरिता दीपक सोनवणे, प्रिया राजेंद्र सोनवणे, मानसी राजेंद्र सोनवणे, मनोज आधार सपकाळे, दक्ष राहुल नगराळे (सर्व रा.अल्का पार्क, वसरापूर स्टेशन रोडख अहमदाबाद) यांचा समावेश आहे. याबाबत हरीश भालेराव यांनी विसरवाडी पोलिसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अरुण कोकणी करत आहेत.


कॉपी करू नका.