टाकरखेडा येथून घराबाहेर बांधलेली बैल जोडी लांबवली


A bullock pair tied outside the house was extended from Takarkheda यावल : तालुक्यातील टाकरखेडा येथून घराबाहेर बांधलेली बैल जोडी चोरट्यांनी लांबवली. शेतकर्‍याने आपल्या घराबाहेर 40 हजार रुपये किंमतीची बैल जोडी बांधलेली असताना चोरट्यांनी संधी साधली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
टाकरखेडा, ता.यावल येथील शांताराम गंगाधर पाटील या शेतकर्‍याची 40 हजार रुपये किंमतीची बैलजोडी त्यांनी शेती काम करून आल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर बांधली असता मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती लांबवली. सर्वत्र बैलजोडीचा शोध घेतला मात्र बैलजोडी कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !