वड्री येथील 36 वर्षीय महिलेचा विनयभंग : पिता-पूत्रांविरोधात गुन्हा


molestation of 36-year-old woman in Vadri : Crime against father and son यावल : तालुक्यातील वड्री गावातील 36 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पित्रा-पूत्रांविरोधात गुन्हा
ज्या घरात तुम्ही राहता त्याबद्दल आम्हाला एक लाख रुपये द्या, अशी मागणी दोघांनी महिलेकडे केली असता महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर महिलेस मारहाण करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गावातीलच संशयित नामदेव खैरणार व गोपाळ खैरणार या पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !