रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण : आरोपीला अटक


Sexual abuse of minor girl in Raver taluka : Accused arrested सावदा : रावेर तालुक्यातील एका गावातील 10 वर्षीय अल्पवयीन मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने संशयिताने घरात बोलावून तिचे लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार सोमवार, 1 मे रोजी पावणेदहा वाजता उघडकीस आला. या प्रकरणी संशयित प्रदीप सुका कोळी (56, रावेर तालुका) याच्याविरोधात पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

घरी कुणी नसताना केले शोषण
सावदा पोलिसात पीडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, 1 मे रोजी रात्री पावणे आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित प्रदीप सुका कोळी (56) याने पीडीत मुलीस घरी कोणी नसताना त्याच्या घर वजा दुकानात बोलावून तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले व नंतर तिचे शोषण केले. हा प्रकार पीडीतेने आईला सांगितल्यानंतर संशयिताविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला सावदा पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अन्वर तडवी करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !