देवळाली स्थानकावर या दोन गाड्यांना आता नव्याने थांबा : प्रवाशांची गैरसोय होणार दूर
LTT-Patna, Mumbai-Amritsar stop at Deolali station भुसावळ : उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि शाळांना सुट्या लागल्याने पर्यटनाला जाणार्यांची संख्या वाढली असल्याने रेल्वे गाड्यांना मोंठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून देवळाली रेल्वे स्थानकावर एलटीटी पटना (13202 व 13201) व मुंबई अमृतसर एक्स्प्रेस (11057 व 11058) या दोन गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून थांबे देण्यात आले आहे.
प्रवाशांना लाभ घेण्याचे आवाहन
देवळाली येथे दोन गाड्यांना थांबा दिल्याने देवळाली येथून येणार्या-जाणार्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच गुजराथमधून महाराष्ट्रात येणार्या गाड्यांना सुध्दा मोठया प्रमाणावर गर्दी होत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उधना-बरौनी एक्स्प्रेस ही विशेष गाडी सुरू केली आहे. ही गाडी 3 ते 31 मे या काळात धावणार आहे. ही गाडी भुसावळ विभागातील जळगाव, भुसावळ खंडवामार्गे धावणार आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





