यावलमध्ये 17 रोजी सीएएच्या व एनआरसी कायद्याविरोधात आंदोलन


यावल  : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरीकत्व सीएएच्या व एनआरसी कायद्याच्या निषेर्धात यावल येथील संविधान बचाव समितीच्या वतीने येत्या 17 जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून या संदर्भातील निवेदन शहरातील संविधान बचाव समिती आणि असंख्य मुस्लीम बांधवांनी शनिवारी पोलिस प्रशासनाला दिले तसेच आंदोलनासाठी परवानगी व बंदोबस्तही मागण्यात आला आहे.

तहसीलसमोर ठिय्या आंदोलन
यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, 17 जानेवारीस शहरातील संविधान बचाव समितीच्या माध्यमातून यावल तहसील कार्यालयासमोर केंद्र शासनाने लादलेल्या नागरीकत्व कायद्याच्या निषेधार्थ देशाच्या संविधानानुसार समाजबांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले आहे. 17 जानेवारीला यावल येथे शुक्रवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने पोलिस प्रशासनाच्या वतीने परवानगी व बंदोबस्ताची मागणी करण्यात आली. यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर व पोलि निरीक्षक धनवडे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर अनिल निळकंठणं जंजाळे, कदीर खान करीम खान, शेख हकीम शेख अलाउद्दीन, नगरसेवक मनोहर बाबुराव सोनवणे, नगरसेवक अस्लम शेख नबी, समीर खान तस्लीम खान, माजी नगरसेवक गुलाम रसुल हाजी गुलाम दस्तगीर, गौतम नथ्थु पारधे, प्रमोद मधुकर पारधे, मुक्तार ईसा पटेल, फिरोजशाह जमीर शाह, ताहेर शेख चांद आदी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !