जळगावच्या व्यापार्याला कांदा विक्रीत 35 लाखांचा गंडा : कर्नाटकमधील आरोपी जाळ्यात
जळगाव : जळगावातील व्यापारी शब्बीर खान यांना कांदा खरेदीत 35 लाखांचा गंडा घालणार्या मोहम्मद एजाज ईस्माईल (रा. भटकल जि. कारवार, कर्नाटक) यास पोलिसांनी अटक केली आहे. टोळीचा म्होरक्या व अटकेतील एजाजचा भाऊ याच्यासह इतर फरार झाले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संबंधित टोळीने रबा ट्रेडर्सच्या नावाने देशभरातील अनेक व्यापार्या 40 ते 50 कोटीत रुपयांत फसवणूक केल्याची माहिती आहे. शनिपेठ परीसरात व्यापारी शब्बीर अब्दुला खान हे 25 वर्षापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आडत व कमिशन एजंंट आहेत. कांदे, लसून खरेदी करून ते विक्री करण्याचा ते व्यापार करत आहेत. 2014 मध्ये खाने कर्नाटक राज्यातील भटकल येथील रबा ट्रेडर्सचे मोहम्मद एजाज ईस्माईल भिस्ती, मोहम्मद शफिक ईस्माईल भिस्ती याच्यासह त्याच्या पत्नी व भागीदारांच्या संपर्कात आले. खान यांचे संबंधितांशी व्यापारी संबंतध होते. या पाच वर्षाच्या काळात अनेकदा खान यांनी भिस्ती या माल पाठविला व त्याचे पैसेही वेळेवर मिळाले.
10 ट्रक कांदा मागवून 35 लाखात फसवणूक
2017 मध्ये मो.शफीक भिस्ती यांनी खान यांना फोनवरुन बाहेर देशात माल पाठवायचा असून नोव्हेंबरपर्यंत 10 ट्रक कांदा पाठविण्यास सांगितले. आजपर्यंच्या विश्वासावर खान यांनी जळगावातील इतरांकडून कांदा खरेदी करुन कधी 15 टन, कधी 16 असे वेेगवेगळ्या दिवशी इंडिया रोडलाईन्सच्या ट्रान्सपोर्टने एकूण 35 लाख 11 हजार 893 रुपये किमतीचा 63 टन कांदा पाठविला. पाठविलेल्या मालाचे पैसे मागितले अस, भिस्ती यांच्यासह त्यांचे भागिदार यांनी आज देतो, उद्या देतो, असे म्हणत पैसे देण्यास टाळाटाळ केली. यानंतर एकदा कोरा चेक पाठवून दिला. खान यांनी थेट बँगलोर गाठून संबधितांची भेट घेतली असता, पैसे न देता संबंधितांनी खान यांना तुझ्या मालाची परस्पर विल्हेवाट लावली, तुला पैसे देणार नाही, तुझ्याने जे होत असेल ते करुन घेणे या भाषेत शिवीगाळ करुन दमदाटी केली. यानंतरही अनेकदा खान यांनी त्याच्यांशी मध्यस्थीमार्फत संपर्क साधला. मात्र भिस्ती यांच्या टोळीने खान याचे 35 लाखांपैकी दमडीही दिली नाही.

