रावेरातील शौचालय घोटाळा प्रकरण : तत्कालीन बीडीओंसह 15 संशयितांना अटकपूर्व जामीन
Raver toilet scam case : 15 suspects including erstwhile BDs granted anticipatory bail रावेर : राज्यभर गाजलेल्या रावेर पंचायत समितीतील वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी हबीब तडवी यांच्यासह 15 जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे तर आतापर्यंत 1 कोटी एक लाख रुपये संशयितांकडून वसुल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
32 संशयितांची जामिनावर सुटका
रावेर पंचायत समितीच्या वैयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचारप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी हबीब तडवी यांच्यासह 15 जणांचे नाव समोर आले होते. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात मागणी केल्याने न्यायालयाने तत्कालीन गटविकास अधिकारी 15 संशयीतांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपींकडून आतापर्यंत एक कोटी एक लाख रुपये वसूल करण्यात आले आहे तसेच वैयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणात अटकेतील 33 पैकी 32 संशयितांचे जामीन झाले असून केवळ एक संशयीत कारागृहात असल्याची माहिती तपासाधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी दिली.
