यावल शहरात सातोद रस्त्यावर दुचाकी घसरली : दोघे गंभीर
Two Wheeler Falls On Satod Road in Yawal City : Two Serious यावल : शहरातून सातोदकडे जाणार्या रस्त्यावर राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 132 सबस्टेशन जवळ दुचाकी घसरून दोघे जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
दुचाकी घसरून अपघात
यावल शहरातून सातोदकडे जाणारा रस्त्यावर राज्य विद्युत वितरण कंपनीचे 132 सब स्टेशन आहे. या सबस्टेशन समोर परसाडे येथील एका 48 वर्षीय व एक 60 वर्षीय इसम दुचाकीवर जात असतांना दुचाकी घसरत अपघात घडला. दोघा जखमींना ग्रामसेवक मजीत तडवी, सतीष सावळे, महेमूद तडवी, फारूक तडवी आदींनी तातडीने उपचारार्थ यावल रुग्णालयात आणले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.सचिन देशमुख, अधिपरीचारीका ज्योत्ना निंबाळकर, दीपाली किरंगे, बापू महाजन आदींनी त्यांच्या उपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
