जळगावात महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या
जळगाव : चाळीसगावातील प्रांत कार्यालयातील वाहन चालक सुरेश आनंदा जाधव यांच्या 23 वर्षीय मुलाने शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पिंप्राळा रेल्वे गेटजवळ घडली. त्याच्या जवळील मोबाईलमुळे त्याची ओळख पटली. घटनास्थळावर त्याची उभी दुचाकीही मिळून आली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. जयेश सुरेश जाधव (23 रा.आशाबाबा नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. पिंप्राळा रेल्वे गेट डाऊन लाईनवर खांबा क्रमांक 418/11 जवळ शुक्रवारी रात्री 9़ 21 वाजेच्या सुमारास राजधानी एक्सप्रेससमेार जयेशने आत्महत्या केली. घटनास्थी आढळलेल्या मोबाईलच्या आधारे तरुणाच्या कुटुंबियांची ओळख पटली. सुरेश जाधव, तसेच मयत जयेशचे मामा डॉ. निलेश जाधव यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतल्याने मयत जयेशच असल्याचे निष्पन्न होताच मुलाला बघून सुरेश पाटील यांनी हंबरडा फोडला. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली.

