फैजपूर रस्त्यावर दुचाकी अपघातात यावलचा तरुण जखमी
A youth from Yaval injured in a two-wheeler accident on Faizpur road यावल : फैजपूर रस्त्यावर महाविद्यालयाच्याजवळ दुचाकी समोर अचानक मोकाट जनावर आल्याने अपघात होवून 19 वर्षीय दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. त्याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगावी हलवण्यात आले.
हाताला झाली दुखापत
अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर फैजपूर रस्त्यावर महाविद्यालयाच्या समोर दुचाकीद्वारे गौरव विलास शिरसाट (19, यावल) हा तरुण जात असताना त्याच्या दुचाकीच्या समोर अचानक मोकाट जनावर आले आणि दुचाकीला अपघात घडला. अपघातानंतर गौरव शिरसाड जखमी झाला. त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णांलयातमध्ये उपचारार्थ आणण्यात आले. रुग्णालयात डॉ.सचिन देशमुख, अधिपरीचारीका ज्योत्ना निंबाळकर, दीपाली किरंगे, बापू महाजन आदींनी त्याच्यावर उपचार केले. त्याच्या हाताला जवळ दुखापत व फ्रॅक्चर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
