यावल तालुका ग्रामपंचायत पोटनिवडणूक : तीन जागा बिनविरोध
यावल : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या आठ जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत प्राप्त 18 अर्जापैकी माघारीच्या दिवशी तीन उमेदवारांनी माघार घेतली व यात कासवा, सांगवी बुद्रुक व चिंचोली येथील प्रत्येकी एक जागा बिनविरोध ठरली. उर्वरीत पाच ग्रामपंचायतीच्या पाच जागांकरीता 12 उमेदवार रिंगणात आहे. या सर्व पाच जागांकरीता गुरुवार. 18 मे रोजी मतदान होणार आहे.
14 सदस्य जागेसाठी पोटनिवडणूक
यावल तालुक्यातील विविध कारणाने रीक्त असलेल्या 12 ग्रामपंचायतीमधील 14 सदस्यांच्या जागेवर पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात सात ग्रामपंचायतीच्या आठ जागांकरीता 20 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते तर छानणीत दोन अर्ज अवैद्य ठरल्यावर 18 वैध अर्जापैकी सोमवारी माघारीच्या दिवशी मुदतीत तीन उमेदवारांनी माघार घेतली व माघारीनंतर कासवा ग्रामपंचायतीत संगीता किशोर तायडे, चिंचोली मधुन सपना पन्नालाल कोळी व सांगवी बुद्रुक मधुन शबनम फिरोज तडवी हे तीन उमेदवार बिनविरोध ठरले आहे. आता कासवा ग्रामपंचायतीच्या एक जागेकरीता तीन, बामणोद एका जागेकरीता दोन, बोरखेडा बुद्रुक एक जागेकरीता दोन, मारूळ एका जागेकरीता दोन व दहिगाव एका जागेकरीता ती असे पाच ग्रामपंचायतीच्या पाच जागेकरीता 12 उमेदवार रिंगणात आहे.
माघारीनंतर चिन्ह वाटप
तहसील कार्यालयात माघारी नंतर चिन्ह वाटप करण्यात आले. संपूर्ण कामकाज तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी सचिन जगताप, बबीता चौधरी, एच.एम.तडवी, जी.टी.सोनवणे, सुयोग पाटील, स्मिता कोळी, प्रवीण पाटील, विलास नागरे, टी.सी.बारेला यांनी पाहिले.
