रस्ता सुरक्षा सप्ताह : जळगावात 20 वाहनांवर कारवाई
जळगाव : रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून शनिवारी उपप्रादेशिक परीवहन विभाग तसेच वाहतूक पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून एका लक्झरीसह 20 प्रवासी वाहने जप्त केली. ममुराबाद रस्ता, शिरसोली मार्ग, ईच्छादेवी चौक याठिकाणी शनिवारी दुपारी राबविण्यात आलेल्या अचानकच्या मोहिमेमुळे वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली होती. अवैध वाहतूक , विना परमीट वाहन चालविणे, कागदपत्रांची अपूर्णता तसेच प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरून वाहने चालविणार्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते.

