अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या चिमुकल्याची विहिरीत ढकलले : प्रियकरासह महिलेला अटक


Toddler pushed into well as obstacle to immoral relationship : Woman arrested with boyfriend विटा : अनैतिक संबंध असलेल्या प्रियकरासोबत विवाह करण्यासाठी सहा वर्षांचा मुलगा अडथळा ठरत असल्याने दोघांनी सहा वर्षीय चिमुकल्याला विहिरीत ढकलले मात्र पोलिसांच्या तपासात आरोपींचे बिंग फुटले. ही घटना लेंगरे, ता.खानापूर येथे मंगळवारी उघडकीस आली. शौर्य प्रकाश लोंढे (6) असे हत्या झालेल्या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई ज्योती प्रकाश लोंढे (28, लेंगरे) व तिचा प्रियकर रूपेश नामदेव घाडगे (वय 25, रा. जोंधळखिंडी, ता.खानापूर) या दोघांना विटा पोलीसांनी अटक केली आहे.

अनैतिक संबंधात चिमुकल्याचा अडसर
लेंगरे येथील ज्योती लोंढे व जोंधळखिंडी येथील रूपेश घाडगे यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यांना विवाह करायचा होता परंतु ज्योतीचा 6 वर्षाचा मुलगा शौर्य हा अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी त्याच्यातील हा अडथळा दूर करण्यासाठी चिमुकल्या शौर्य याचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. त्यानुसार या दोघांनी कारस्थान रचत 6 मे रोजी शौर्य याला दुचाकीवर नेऊन ढोराळे रस्त्यावर आडरानात असलेल्या विहीरीतील पाण्यात ढकलले व नंतर शौर्य हा बेपत्ता झाला असून त्याचे अपहरण झाल्याची तक्रार ज्योती हिने विटा पोलीसांत दिली.






अखेर उलगडला गुन्हा
पोलीस तपास सुरू असताना पोलीसांना शौर्य याचा मृतदेह ढोराळे रस्त्यावरील आडरानातील विहीरीच्या पाण्यावर तरगंत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीपाद यादव, उपनिरीक्षक पी. के. कण्हेरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शौर्यचा मृतदेह विहीरीतून बाहेर काढला. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना शौर्यची आई ज्योती व प्रियकर रूपेश यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. यावेळी पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता अनैतिक संबंधास व विवाहाला अडसर ठरत असल्याचे आम्हीच शौर्य याला विहीरीत फेकून देऊन त्याचा कायमचा काटा काढल्याचे पोलीसांत कबुली दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !