भुसावळात जुन्या वादातून प्रौढाला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा
Adult assaulted in Bhusawal due to old dispute: Crime against four भुसावळ : जुन्या वादातून 52 वर्षीय प्रौढाला चौघांनी मारहाण केल्याचा प्रकार तु.स.झोपे शाळेजवळील हनुमान नगर भागात शनिवारी सकाळी साडेसहा वाजता घडला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जुना वाद उफाळला
रंजन मधुकर फालक (52, हनुमान नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, शनिवार, 6 रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संशयित गिरणारे, बाणाईत व दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या खाजगी मालमत्तेत अनधिकृतरीत्या प्रवेश करीत जुन्या वादातून तक्रारदाराला मारहाण केली. या मारहाणीत फालक खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागून जखम झाली. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुमन राठोड करीत आहेत.
