भुसावळात सलून व्यावसायीकाची गळफास घेत आत्महत्या
A salon businessman committed suicide by hanging himself in Bhusawal भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी भागातील सलून व्यावसायीकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट कळू शकले नाही. राजेंद्र खोंडे (40, हुडको कॉलनी, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.
शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
राजेंद्र खोंडे हे हुडको कॉलनीत कुटुंबियांसह वास्तव्यास होते. कुटूंबातील सदस्य रविवारी पुढच्या हॉलमध्ये झोपले असताना खोंडे यांनी रविवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या बेडरूममध्ये साडीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच कुटूंबियांनी टाहो फोडत खोंडे यांना खाली उतरतवून ट्रामा सेंटरमध्ये हलवले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत खोंडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, आई, वडिल असा परीवार आहे. तपास सहाय्यक फौजदार ईकबाल सैय्यद व नाईक रज्जाक शेख करीत आहेत.
