वड्री आश्रमशाळेतील शिपायाची विनयभंगाच्या आरोपानंतर आत्महत्या : दाम्पत्याविरोधात गुन्हा
Vadri ashram school constable commits suicide after molestation allegations : Crime against couple यावल : तालुक्यातील वड्री येथील एका 58 वर्षीय इसमाविरुद्ध खोटी विनयभंगाची तक्रार दिल्याने समाजात त्यांची प्रतिमा मलीन झाली व चरीत्र हनन झाल्यामुळे व्यथीत झालेल्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोट्या आरोपांमुळे व्यथीत होवून आत्महत्या
वड्री, ता.यावल येथील नामदेव दगडू खैरनार (58) या इसमाने सोमवारी डोंगरकठोरा आश्रमशाळेत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात योगराज नामदेव खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे वडील नामदेव खैरनार यांच्या विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात प्रमोद रघुनाथ डोंगरे व त्यांची पत्नी सुजाता रघुनाथ डोंगरे (वड्री) या दाम्पत्याने विनयभंगाची खोटी तक्रार नोंदवली आणि समाजात त्यांची प्रतिमा मलीन होत त्यांचे चरीत्र हनन झाले. या गोष्टीने व्यथीत होऊन त्यांनी सुसाईड नोट लिहून डोंगरकठोरा आश्रम शाळेत गळफास घेऊन आत्महत्या केली.
अखेर दाम्पत्याविरोधात गुन्हा
आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या या दाम्पत्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.
