जलजीवन मिशनमुळे पाणीप्रश्न सुटणार : आमदार संजय सावकारे


Jaljeevan Mission will solve water problem: MLA Sanjay Savkare भुसावळ : जलजीवन मिशन योजनेतून शहराला लागून असलेल्या मात्र पालिका हद्दीतील समाविष्ट नसलेल्या भागांमध्ये पाण्याचा प्रश्न सुटणार असून नागरीकांचे हाल लवकरच थांबतील, असा आशावाद आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केला. जामनेर रोडवरील गुलमोहर प्रेस्टीज भागात एक लाख ीटर क्षमतेच्या जलकुंभांचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते सोमवारी झाले. प्रसंगी ते बोलत होते.

योजनेमुळे नागरीकांना मोठा दिलासा
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच पाणीपुरवठामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी तसेच आमदार सावकारे यांच्या पाठपुराव्याने ही योजना या भागात मंजूर झाली आहे. याप्रसंगी बापू महाजन, रमेश सैतवाल, रवींद्र खरादे, काशीराम बारेला, दिलीप लोखंडे, जानकीराम सपकाळे, राजेंद्र तायडे, विनोद बाविस्कर, अनिल सोनवणे, दीपक जैन, भैय्या फालक, कार्यकारी अभियंता खर्चे, लखीचंद पाटील, प्रवीण बावस्कर, शरद तायडे, हरीश पाटील, बाळू राणे आदी नागरीक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !