साधुसंतांची शिकवण अंगीकारावी
माजी मंत्री एकनाथराव खडसे : आपले परीवार सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ‘कृतज्ञता ऋणानुबंध सन्मान’ सोहळा थाटात
भुसावळ : महाराष्ट्राला साधुसंतांची परंपरा लाभलेली आहे. साधुसंतांनी समाजाला शिकवण दिली असून त्यांनी दिलेली शिकवण अंगीकारावी, असे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले. आपले परिवार सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित कीर्तन सोहळ्यात ’ कृतज्ञता ऋणानुबंध सन्मान’ पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर खा.रक्षाताई खडसे, महानंद दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रमोद नेमाडे, प्रा. सुनील नेवे, अॅड. बोधराज चौधरी, प्रभात चौधरी, लेखक धनंजय कोल्हे, अजय नागराणी, पुरुषोत्तम नारखेडे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना खडसे यांनी वाचन संस्कृती कमी होत चालल्याची खंत व्यक्त केली.मात्र आपले परिवार वाचनालयाने पुढच्या पिढीला ज्ञान मिळावे, असा पुस्तकांचा ठेवा जोपासला असे म्हणत आयोजकांचे त्यांनी कौतुक केले.
मान्यवरांची होती उपस्थिती
यावेळी स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मिना चौधरी यांनी गितेचा 15 व्या अध्यायाचे वाचन करुन कार्यक्रमाला सुरवात केली.कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पंचायत समितीच्या सभापती मनिषा पाटील, भाजप शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी, फैजपूर येथील नरेंद्र नारखेडे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रा. प्रभात चौधरी आदींचा गौरव करण्यात आला. माजी मंत्री एकनाथराव खडसे व महानंद दूध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांना कृतज्ञता ऋणानुबंध सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. समाजात चांगले काम करणारे व्यक्ती समोर येत नाहीत. आपले परिवार वाचनालातर्फे झालेल्या कीर्तन महोत्सवातून गौरव सोहळ्यातून हे व्यक्ती समाजासमोर आल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. आपले परिवार वाचनालय अध्यात्मिक व सामाजिक शक्तीकेंद्र म्हणून उदयास आले आहे. या केंद्राच्या आवारात बगीच्या विकसीत करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिले.प्रास्ताविक आयोजक शांताराम पाटील यांनी केले.
मंदाताई खडसे म्हणाल्या, मी पुन्हा येईल?
महानंद दुध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे सन्माला उत्तर देतांना म्हणाल्या की, गौरव झालेल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. कार्यक्रमासाठी पूढच्या वर्षीसुध्दा’ मी पुन्हा येईल’, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हंशा पिकला.
विविध पुरस्काराने गौरव
समाज भुषण पुरस्कार महेश देविदास फालक यांना देण्यात आला. तर अटल प्रतिष्ठानचे प्रा. सुनील नेवे यांना व्यवस्थापन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांना उत्कृष्ठ संघटक गौरव पुरस्कार दिला गेला. किशोर ढाके व मंगला भिमराव पाटील यांना उद्योजक गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तर प्रमोद नेमाडे व नगरसेवक निर्मल कोठारी यांना बेस्ट कॉन्सीलर पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. आसोदा येथील लेखक धनंजय कोल्हे यांना लेखन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

