भुसावळात ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे मोफत ‘शो’
भुसावळ : देशभरातील हिंदू तरुणीचे मन परीवर्तन करून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडण्याचे प्रकार केरळ राज्यात घडल्यानंतर या विषयावर आधारीत ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाची विपुल अमृतलाल यांनी निर्मिती केली. शहरातील पांडुरंग टॉकीजमध्ये शुक्रवार, 5 मे पासून या चित्रपटाचे प्रदर्शन झाल्यानंतर शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हिंदू तरुणींवर कशा पद्धत्तीने अत्याचार केले जातात व कशा पद्धत्तीने धर्म परीवर्तन केले जाते याची हिंदू तरुणींसह महिलांना माहिती होण्यासाठी भुसावळ शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा सीताराम कन्स्ट्रक्शनचे भूषण वराडे, श्री नमो विचार मंच तथा साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांच्या सहकार्याने महिला व तरुणींना या चित्रपटाचा मोफत शो दाखवण्यात आला.
धर्मांतराच्या माध्यमातून पारतंत्र्यात लोटण्याचे कारस्थान
द केरळा स्टोरी हा चित्रपट दहशतवादी संघटनांनी महिलांच्या केलेल्या तस्करीच्या संदर्भात सत्यता सांगतो. या महिलांच्या आयुष्याची हृदयद्रावक घटना चित्रपटातून मांडण्यात आली आहे. नर्स होण्यासाठी केरळात आलेल्या तरुणींना ईसीस संघटनेच्या आतंकवादी कशा पद्धत्तीने बनवण्यात आले शिवाय देशातील महिलांसह तरुण मुलींना कशा पद्धतीने जबरदस्तीने षडयंत्र करून दहशतवादी बनवून पुन्हा आपल्याच देशाला पुन्हा पारतंत्र्यात लोटण्याचे कारस्थान सुरू आहे याचबाबतची सत्यकथा चित्रपटातून मांडण्यात आली आहे. अधिकाधिक नागरीकांसह महिला व 18 वर्षावरील तरुणींनी हा चित्रपट पहावा, असे आवाहन शिशिर जावळे यांनी केले आहे.

यांची प्रसंगी उपस्थिती
याप्रसंगी निर्मोही आखाड्याचे संत श्री महंत कन्हैया दासजी, फैजपूर खंडोबा देवस्थानचे महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी यांचे उत्तरराधिकरी पवन दासजी महाराज यांची विशेष उपस्थिती होती व त्यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले व या चित्रपटाचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन केले. झाशीची राणी लक्ष्मी देवी, सीता माता, देवी अहिल्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देश भक्तीचे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले. शिशिर जावळे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी देवेंद्र वराडे, ललित नेहते, ऋषिकेश शिंदे, गोसेवक रोहित महाले, राहुल राणे, दुर्गेश चौधरी, किशोर प्रजापती, संजय काठोडे
आदींनी परीश्रम घेतले.
