भुसावळ शहरासह विभागात राजमाता जिजाऊंना वंदन
भुसावळात दुचाकी रॅलीने वेधले लक्ष : ठिकठिकाणी प्रतिमा पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
भुसावळ : भुसावळ शहरासह विभागात राजमाता जिजाऊ व तेजपुरूष स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त वंदन करण्यात आले. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर थोर पुरूषांच्या प्रतिमांचे पूजन केल्यानंतर मान्यवरांनी कार्याचा आढावाही सांगितले. भुसावळ शहरातून काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले.
भुसावळ रॅलीने वेधले लक्ष
भुसावळ- राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भगवे फेटे परीधान करून महिला व तरुणींनी रॅली काढली. अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ममता पाटील, स्मिता चौधरी, नगरसेविका सविता मकासरे, सीएलएफच्या वंदना शंखपाल, आर्य फाउंडेशनच्या डॉ.वंदना वाघचौरे, कोटेजा महाविद्यालयाचे प्रा.पाटील, अनुश्री बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा जयश्री इंगळे, उपाध्याय वंदना जोगदंड, सचिव शिला लहाने उपस्थित होत्या.
थोरगव्हाण जिल्हा परीषद शाळा
यावल- तालुक्यातील थोरगव्हाण शिरसाड येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ आणि थोर युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य विनोद भालेराव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी थोर पुरूषांची वेषभूषा साकारून त्यांच्याविषयी विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक महेंद्र देवरे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्याविषयी जीवनातील प्रेरक प्रसंग विद्यार्थ्यांना आपल्या खास शैलीत सांगितले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सुरेश चौधरी, विजय चौधरी, पत्रकार गोकुळ तायडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
आमदारांचे संपर्क कार्यालय
भुसावळ- आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती (युवक दिन) साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रमोद नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, प्रा.प्रशांत पाटील, परीक्षित बर्हाटे, निक्की बतरा, अजय नागराणी, पराग भोळे, अॅड.बोधराज चौधरी, प्रमोद पाटील, प्रमोद सावकारे, सतीश सपकाळे, रमाशंकर दुबे, भुसावळ शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, रवींद्र पाटील, लिलाधर प्रजापती, संजय शितोळे, रवींद्र दाभाडे आदी उपस्थित होते.
नाडगावला रक्तदान शिबिर
नाडगाव- राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर तसेच मुक्ताईनगर मतदारसंघातील नवनियुक्त आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. नाडगाव ग्रामस्थांनी प्रसंगी आमदारांचा सत्कार करीत समस्या सोडवण्यासाठी साकडेही घातले. अध्यक्षस्थानी भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद्रसिंग पाटील होते. प्रमुख पाहुणे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.उद्धव पाटील, काँग्रेस चे ईश्वर जंगले, शिवसेनेचे गजानन खोडके, लिलाधर पाटील, मेहबूब शेख, देवा खेवलकर, विजय पालवे, डॉ. सुधीर पाटील, समाधान महाजन, मुक्ताईनगर येथील जीवन पवार, सुनील पाटील, प्रवीण चौधरी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप पाटील तर आभार अजय गवळे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव येथील सरपंच पती अजय गवळे, रोहित पोळ, गणेश सोलंकी, भूषण पाटील, नितीन भाऊ, बाबुराव बढे,भिका व्यवहारे व ग्रामस्थांनी केले. यावेळी सागर पाटील, शिवाजी ढोले, वरखेडचे आधार पाटील, आबा पाटील, संजय पाटील, अमोल राजपुत, सचिन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भगवान पाटील, सरदार पाटील व परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
भुसावळात अभाविपच्या वतीने पथनाट्य
भुसावळ- अखिल भारतीय विद्यार्थी परीषद, भुसावळ शाखेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त 12 जानेवारी व 23 जानेवारी दरम्यान युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी बसस्थानकावर स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच महिला सक्षमीकरण या विषयावर भुसावळ बस आगारात पथनाट्य अभाविप कार्यकर्त्यांच्या वतीने सादर करण्यात आले. यावेळी अभाविप जिल्हा संयोजक मनोज जंजाळ, प्रा.डॉ.संजय बाविस्कर, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, शहरमंत्री वरुण कुलकर्णी, शहरसहमंत्री शुभम भारसाखरे, प्रवीण, संकेत भारसाखारे, हेमंत सालुंखे, सोनी हजारे, निकिता बोरोले, प्रियंका भालेराव उपस्थित होत्या.

