मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने अट्रावलचे सरपंच व डांभूर्णीचे सदस्य अपात्र


Sarpanch of Atraval and members of Dambhurni disqualified for not submitting caste validity certificate within the time limit यावल : तालुक्यातील अट्रावल येथील सरपंच यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तसेच डांभुर्णी येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र संदर्भात बनावट टोकन सादर केल्याने जिल्हाधिकार्‍यांनी दोघांना अपात्र ठरवले आहे. या संदर्भातील निकाल जाहीर झाला आहे.

कारवाईने राजकीय गोटात खळबळ
यावल तालुक्यात जानेवारी 2021 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवरून मोहन भीमराव कोळी हे निवडून आले होते व ते सरपंच आहेत. दरम्यान त्यांनी मुदतीत अनुसुचित जमातीचे वैधता जात प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून त्यांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अपात्र घोषित केले आहे तसेच डांभूर्णी ग्रामपंचायतीच्या सदस्य सुनंदा हिरालाल कोळी यांनी जून 2022 मध्ये पोटनिवडणुकीत अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर निवडणूक लढवली होती. या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी जात वैद्यता प्रमाणपत्राकरीता सादर केले असल्याचे टोकन अर्जासोबत जोडले होते मात्र सदर टोकन हे बनावट असल्याचे प्रशासनाचे निदर्शनास आले. या कारणावरून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. या संदर्भातील आदेश यावल तहसील कार्यालयात प्राप्त झाले असून तहसीलदार महेश पवार यांनी या संदर्भातील आदेश बजवण्याच्या सूचना केल्या असून आदेश बजवण्याची कार्यवाही सुयोग पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !