खिरवड येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग : तरुणाविरोधात गुन्हा


molestation  of minor girl in Khirwad : Crime against youth रावेर : तालुक्यातील खिरवड येथील 12 वर्षीय मुलीचा अनधिकृतपणे घरात प्रवेश करीत तरुणाने विनयभंग केला. ही घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित शेख रीजवान शेख समशोद्दीन उर्फ ईज्जू (खिरवड, ता.रावेर) याच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल
12 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी घरी कुणी नसताना ती टीव्ही पाहत असताना संशयित शेख रीजवान हा दुचाकीवरून आला व त्याने पेरू कापण्यासाठी चाकू मागितला असता पीडीतेने तो दिल्यानंतर संशयिताने दिलेली पेरूची फोड खाण्यास नकार दिल्यानंतर संशयिताने पीडीतेशी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी मंगळवारी महिला शिपाई माधवी मुकेश सोनवणे व महिला दक्षता समिती सदस्य सुवर्णा भागवत यांच्या समक्ष पीडीतेने घडलेला प्रकार कथन केल्यानंतर पोस्कोन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !