निमखेडीत लग्नसोहळ्यात दोन कुटूंबांमध्ये हाणामारी : परस्परविरोधी गुन्हे
Clash between two families during wedding ceremony in Nimkhedi: conflicting crimes मुक्ताईनगर : तालुक्यातील निमखेडी येथे लग्नसोहळ्यात दोन कुटूंबात किरकोळ कारणावरून वाद उफाळल्याने हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून एका गटाच्या 13 तर दुसर्या गटाच्या 14 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तुंबळ हाणामारीत दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले.
घराला लाथ मारल्याचा जाब विचारल्याच्या वादातून मारहाण
घराला संशयितांनी लाथा मारल्यानंतर त्याबाबत जाब विचारल्याच्या वादातून कुटूंबावर प्राणघातक हल्ला करीत मारहाण करण्यात आल्याची घटना तालुक्यातील निमखेडी येथे सोमवार, 8 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी 14 संशयितांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. समाधान जानू कंडारे (60, निमखेडी, ता.मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीनुसार, संशयितांनी मंगळवारी सायंकाळी त्यांच्या भावाच्या घराला लाथा मारल्याने त्याचा जाब विचारल्यानंतर गैरकायद्याची मंडळी जमवून लाठ्या-काठ्या तक्रारदारासह त्यांच्या पत्नीला, मुलीला व साक्षीदारांना मारहाण केली. या प्रकरणी निलेश रमेश घुले, प्रदीप रमेश घुले, विकास रामदास घुले, राजू रमेश घुले, रमेश निना घुले, शांताराम नामदेव घुले, रामदास निना घुले, संतोष रामदास निंबरकर, जनाबाई रामदास घुले, जिजाबाई अशोक घुले, पंचफुलाबाई रमेश घुले, संगीताबाई संतोष उंबरकर, कासाबाई महादेव घुले, निर्मलाबाई रमेश घुले (सर्व रा.निमखेडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसर्या गटाच्या तक्रारीवरून 13 संशयितांविरोधात गुन्हा
या प्रकरणी दुसर्या गटातर्फे विकास रामदास घुले (23, निमखेडी) यांच्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ निलेश रमेश घुले यास जुन्या वादातून निर्मलाबाई संदीप चंदनशिवे यांनी शिविगाळ केल्याने त्याबाबत भाऊ तिच्या वडिलांना समजावण्यास गेला असता तक्रारदारासह त्याच्या भावाला, आईला, काकाला शिविगाळ करून मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या प्रकारात घुले यांच्या आईची 10 ग्रॅम वजनाची व 25 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत गहाळ झाली. या प्रकरणी संशयित समाधान जानू खंडारे, लक्ष्मण जानू खंडारे, सचिन समाधान खंडारे, सागर समाधान खंडारे, आदित्य श्रावण कांबळे, मीनाबाई संदीप चंदनशीवे, आरती श्रावण कांबळे, शुभांगी सचिन खंडारे तसेच गोटीराम, श्रावण कांबळे, कोकिळा गोटीराम, निर्मलाबाई खंडारे, साधन खंडारे (पूर्ण नाव नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक प्रदीप इंगळे करीत आहेत.
