वरणगाव भाजपा शहर संयोजक महेश सोनवणेंविरूद्ध गुन्हा
वरणगाव : भारतीय जनता पार्टी शहर संयोजक महेश सोनवणे यांनी फेसबूक अकाउंटवर धार्मिक भावना दुखावणारे व्हिडिओ टाकल्याने त्यांच्याविरुद्ध वरणगाव पोलिसात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बोदवड येथील पोलीस निरीक्षक सुनील खरे या गुन्ह्याचा तपास करीत असून याबाबतच्या तांत्रिक माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या माहितीनंतर पुढील कारवाईची दिशा ठरवली जाणार आहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसात येथील शहीद बेग अल्ताफ बेग मिर्झा यांनी फिर्याद दिली.

