जळगावातील द रेमंड मिलमधील कर्मचार्यास सेवानिवृत्तीनिमित्त निरोप
भुसावळ : जळगावातील द रेमंड मिलचे कर्मचारी सूर्यकांत (राजू) चौधरी हे 39 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने त्यांना प्रशासन व युनियनतर्फे निरोप देण्यात आला. चौधरी हे भुसावळ येथील चंद्रकांत जनार्दन चौधरी (चुनवाडेकर) यांचे धाकटे बंधू आहेत. निरोप समारंभप्रसंगी रेमंड मिल व सेक्शनचे अनिकेत चौधरी, चंद्रशेखर माळी, सिंग, शहापुरे बंधू युनियनचे नवल पाटील, पुरुषोत्तम खडके, भास्कर रडे व सहकारी उपस्थित होते. कामावर असलेली श्रद्धा व आत्मसात केलेले कौशल्याच्या आधारे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक उत्पादन पूर्ण करण्यात सूर्यकांत चौधरी यांचा हातखंडा असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी चौधरी यांच्या पत्नी मंजुषा चौधरी, वडील बंधू चंद्रकांत चौधरी, मुलगा दवेश चौधरी उपस्थित होते.

