भुसावळात वंचित आघाडीतर्फे आरोग्य तपासणी शिबिर
भुसावळ : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय अॅड..बाळासाहेब आंबेडकर यांचा बुधवारी वाढदिवस असल्याने वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी व गोदावरी फाउंडेशन, डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या सहयोगाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
उद्घाटन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रवीकांत वाघ यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वंचितचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे होते. शिबिरात डॉ.उमेश काशीकर, डॉ.शुभांगी जयस्वाल, डॉ.जिगिशा रेड्डी, जनसंपर्क अधिकारी हितेश कोल्हे, नर्सिंग स्टॉप समीक्षा ठोंबरे, गौरव पाटील आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमास जिल्हा महासचिव दिनेश इखारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, जिल्हा संघटक अरुण तायडे, जिल्हा आय.टी.सेलप्रमुख सचिन बार्हे, शहर महासचिव देवदत्त मकासरे मेजर, म.आ.जिल्हा महासचिव वंदना आराक, अतुल पाटील, दिलीप भालेराव, पंकज सपकाळे, आकाश बागुल, छाया हिरोळे आदींची उपस्थिती होती.


