मुक्ताईनगरात कामचुकार अधिकार्यांची आमदारांनी काढली खरडपट्टी
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या भेटीप्रसंगी 90 टक्के कर्मचारी गैरहजर
In Muktainagar, the MLAs took out the wrongdoing officials कुर्हाकाकोडा : तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या मुक्ताईनगरत पंचायत समिती कार्यालयात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी अचानक भेट देत कर्मचार्यांची हजेरी घेतली असता तब्बल 90 टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच संताप व्यक्त करीत अधिकार्यांना धारेवर धरले. कर्मचारी नियमित हजर राहिले नाही तर त्यांची खैर नाही, असा दमही त्यांनी दिला आहे. मंगळवारी प्रशासकीय कामकाजाचा आठवड्यातील दुसराच दिवस असताना कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून येतात आमदार पाटील यांनी हालचाल रजिस्टरची मागणी केली असता कर्मचारी गोंधळला.
यांची होती उपस्थिती
आमदार पाटील यांनी याची दखल घेत तत्काळ जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामविकास सचिव यांच्याशी संपर्क करीत दोषी कर्मचार्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, शिवसेना विभागप्रमुख महेंद्र मोंढाळे, युवासेनेचे सचिन भोई, नीलेश मेढे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी व प्रशांत पाटील उपस्थित होते.


