रमजीपूरच्या प्रौढाचा दारूच्या नशेत गळ्यावर वार केल्याने मृत्यू
Ramjipur adult dies after being stabbed in the neck while under the influence of alcohol रावेर : दारूच्या नशेत गळ्यावर वार केल्याने तालुक्यातील रमजीपूर येथील 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू ओढवला. या प्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुधाकर नथ्थू प्रजापती (45, रमजीपूर, ता.रावेर) असे मयत युवकाचे नाव आहे.
धारदार वस्तू मारून आत्महत्या
सुधाकर प्रजापती यांनी दारूच्या नशेत गळ्यावर काहीतरी धारदार वस्तू मारल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुधवारी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.
