रावेरात प्रौढाला मारहाण : एकाविरोधात गुन्हा


Assaulting an adult in a raver : Offense against one रावेर : शहरातील सिद्धार्थ नगर भागातील युवकाचे लग्न जमू न देण्यासाठी युवकाच्या वडिलांना दारूच्या नशेत शिविगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित मुकेश सुरेश तायडे (सिद्धार्थ नगर, रावेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
सुरेश भोजू तायडे (सिद्धार्थ नगर, रावेर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा नाशिकस्थित मोठा मुलगा विशाल याच्या लग्नासाठी पाहुणे येणार असल्याने व लग्न ते जुळवत असल्याने हे लग्न कसे जुळते? असे म्हणत संशयित मुकेश तायडे याने दारूच्या नशेत शिविगाळ केली तसेच लाकडी दांडा डोक्यात मारून दुखापत केली. तपास नाईक विष्णू भील करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !