रावेरात एकाला मारहाण करीत जातीवाचक शिविगाळ : एकाला अटक


Caste abuse by beating one in Raver : One arrested रावेर  : घरासमोरून गेलेली इलेक्ट्रीक वायर पाहत असताना काय पाहत आहेत, असे म्हटल्याचा राग आल्याने एकाला मारहाण करीत जातीवाचक शिविगाळ करण्यात आली. या प्रकरणी एकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.

जातीवाचक शिविगाळ करीत मारहाण
संतोष चावदास सोनवणे (35, अण्णाभाऊ साठे नगर, रावेर) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 9 रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास संशयित शरीफ रहेमान कुरेशी (उर्फ चांदणी पहेलवान) (कुरेशी मोहल्ला, रावेर) हा तक्रारदाराच्या घराच्या दरवाजासमोर आला व इलेक्ट्रीक वायर पाहत असताना काय पाहत आहे? असे विचारल्याच्या रागातून संशयिताने अनधिकृतपणे घरात प्रवेश करीत फिर्यादी संतोष सोनवणे यांच्यासह त्यांच्या आईला मारहाण केली तसेच जातीवाचक शिविगाळ केली व तुम्ही जास्त मातले आहोत, येथे कसे राहतात? हे पाहतो, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. रावेर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक केली. तपास पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !