कुसूंबा येथील महिलेला अश्लील शिविगाळ
रावेर : तालुक्यातील कुसूंबा बु.॥ विवाहितेच्या मोबाईलवर फोन करून महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने अश्लील शिविगाळ केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
कुसूंबा येथील पीडीतेच्या 31 वर्षीय पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर 7569196887 या क्रमांकावरून आलेल्या दूरध्वनीधारकाने (नाव, गाव माहित नाही) मराठी भाषेत असभ्य भाषा वापरून विनयभंग करण्याच्या आदेशाने शिविगाळ केली. या प्रकरणी संशयिताविरोधात भादंवि 507, 506, 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सतीश दिनकर सानप करीत आहेत.
