भुसावळ शहरातील रेल्वे कर्मचार्याचा मृत्यू
Death of railway employee in Bhusawal city भुसावळ : शहरातील समता नगर भागातील रहिवासी असलेल्या रेल्वे कर्मचार्याचा बुधवारी मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत्यूचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.
शहरात पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
सरहान रज्जू (46, समता नगर, भुसावळ) असे मयत कर्मचार्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास सरहान रज्जू यास भुसावळातील रेल्वे रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रज्जू हे रेल्वे विभागात नोकरीला होते मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.
