जळगावात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला
जळगाव : शहरातील नवीन बी.जे. मार्केट परीसरातील कचराकुंडीत सोमवारी सकाळी स्त्री जातीचे नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कचरा वेचत असताना काही मुलांना का कापडात गुंडाळलेले स्त्री जातीने नवजात अर्भक आढळल्यानंतर जिल्हा पेठ पोलिसांना माहिती कळवण्यात आली. उपनिरीक्षक एम.ए.वाघमारे, नाईक निलेश पाटील, रामेश्वर ताठे यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. दरम्यान, अनैतिक संबंधातून हे बालक जन्माला आल्याची शक्यता असून बेवारसरीत्या अर्भकाला फेकणार्या मातेचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.

