भुसावळातील साईजीवन सुपर शॉपचा कर्मचारी अपघातात ठार


An employee of Saijeevan Super Shop in Bhusawal was killed in an accident भुसावळ : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला कट मारल्याने झालेल्या अपघातात भुसावळातील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवार, 9 रोजी सकाळी 10 वाजता साकळी, ता.यावल गावाजवळ घडला. या अपघाता भुसावळ शहरातील पंढरीनाथ नगरातील रहिवासी व साईजीवन सुपर शॉपमधील कर्मचारी डिगंबर संजय चौधरी (26) (Digambar Sanjay Chaudhary) याचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला तर शेखर पगारे (भुसावळ) हा तरुण किरकोळ जखमी झाला.

अज्ञात वाहनाने कट मारल्याने अपघात
भुसावळातील डिगंबर चौधरी हा तरुण मित्र शेखर पगारेसह चोपडा शहराकडून यावलकडे येत असताना अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला कट मारल्याने दुचाकी घसरल्याने डिगंबर चौधरी या तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली तर शेखर हा किरकोळ जखमी झाला. डिगंबर याच्या प्रथमोपचार केल्यानंतर त्यास जळगाव येथे हलवण्यात आल्यानंतर डोक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. गुरुवारी रात्री उशिरा यावल रोडवरील तापी स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी, बहिण असा परीवार आहे. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !