बोदवड कृउबा सभापतीपदी सुधीर तराळ बिनविरोध उपसभापती

आमदार एकनाथरााव खडसे यांनी केला नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार


Bodwad Kriuba as Chairman Sudhir Taral unopposed Vice Chairman बोदवड : बोदवड कृउबाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला तर शिंदे गटातील केवळ एक सदस्य निवडणुकीत निवडून आला होता. शुक्रवारी निवडून आलेल्या संचालकांमधून सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात सभापतीपदी सुधीर रामदास तराळ तर उपसभापती धोंडखेडा येथील ज्ञानेश्वर अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तराळ हे अंतुर्लीतील विनोद तराळ यांचे बंधू आहेत.

शिवसेना संचालकांची निवडीकडे पाठ
निवडीप्रसंगी भाजप-शिवसेनेच्या जयपाल बोदडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या राजेंद्र फिरके यांनी पाठ फिरवली. पीठासन अधिकारी म्हणून मंगेशकुमार शहा होते. त्यांना सहकार अधिकारी एम.बी.गाढे, सचिव विशाल चौधरी यांनी सहकार्य केले. नूतन सभापती व उपसभापतींचा आमदार एकनाथ खडसे व रोहिणी खडसे, विनोद तराळ, रामदास पाटील यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !