चोपड्यातील ललित कला केंद्रात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात
चोपडा : भगिनी मंडळ चोपडा संचलित ललित कला केंद्र,चोपडा येथे मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा.संजय नेवे यांनी मराठी बोलीभाषा व मातृभाषेचे महत्त्व तसेच तिचे वळण व त्यानुसार शब्दफेक- कोणत्या शब्दांवर कसा जोर असावा, ती भाषा किती स्पष्ट असावेत, असे मराठी विषयी आपणास अभिमान असावा हेच स्पष्ट केले. यानंतर प्रताप विद्या मंदिर येथील प्रसिद्ध सुलेखनकार व ज्येष्ठ कलाशिक्षक पंकज नागपुरे यांनी मराठी अक्षरांपासून चित्र निर्मिती कशी करता येते? यावर दहा ते बारा प्रात्यक्षिक करून दाखविले विविध पार्श्वभूमीवर अक्षरे लहान-मोठे करून सुंदर सूलेखनापासून आकर्षक चित्रनिर्मिती चे धडे दिलेत. त्यात विविध माध्यम शाही, पेन, ब्रश, बोरु यांचा वापर कसा करावा ते प्रत्यक्ष कृतीतून दाखविले. प्रात्यक्षिकांती प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी आभार प्रदर्शन केले.मराठी भाषा पंधरवाड्यात यानिमित्त फौंडेशन, ए.टी.डी. व जीडी आर्ट च्या विद्यार्थ्यांसाठी कलात्मक वळणदार, सुवाच्च व शुद्धअक्षर लेखन स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.साळी, प्रा.बारी, प्रा. पाटील, भगवान बारी, सेवक अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी यांनी सहकार्य केले.

