चिखली येथून अल्पवयीन तरुणीला सिनेस्टाईल पळवले : त्रिकूटाविरोधात गुन्हा
Cinestyle abducted minor girl from Chikhali: Crime against trio फैजपूर : जवळच असलेल्या चिखली खुर्द येथील अल्पवयीन मुलीला त्रिकूटाने फूस लावून पळवून नेल्याची घटना श्रक्रवारी रात्री 11.30 वाजता घडली. या प्रकरणी तीन संशयितांविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघा तरुणांविरोधात गुन्हा
चिखली खुर्द गावातील शेतकरी परीवारातील 16 वर्ष चार महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला संजय विकास गाढे (रेंभोटा, ता.रावेर) व त्याच्या सोबतच्या अनोळखी दोघांनी शुक्रवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दुचाकीवर बसवून फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी अल्पवयीन तरुणीच्या पित्याने फैजपूर पोलिसात तक्रार दिल्यावरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम.जे.शेख करीत आहेत.
